१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार - ‘यूजीसी’च्या गाईडलाइन्स जारी
कारंजा:(न्यूज नेटवर्क प्रतिनिधी)
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत असे आयोगाने म्हटले -याबाबतच्या मार्गदर्शका प्रसिद्ध झाल्या झाल्या आहेत
काय आहेत यूजीसी’च्या गाईडलाइन्स
▪️ विद्यार्थ्यांचे वर्ग आधी 50 टक्केच उपस्थितीत सुरू करावेत.इतर विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईन घेण्यात यावी, परंतु त्यांनी गटागटाने अधूनमधून प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
▪️ प्रवेशद्वारावर थर्मल क्रीनिंग करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा तसेच वर्गांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे तसेच महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंग राखता येऊ शकेल अशाच खेळांना परवानगी द्यावी
विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना मास्क अनिवार्य आहे तसेच बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो संस्थेत प्रवेश देऊ नये , तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका टाळाव्यात.
▪️ वसतिगृहे उघडली तर त्यात रूम-शेअरिंगला परवानगी नाही तसेच वसतिगृहांमध्ये परतणाऱया विद्यार्थ्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवावे
▪️ निवासी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संस्थेबाहेर जाणे शक्यतो टाळावे त्यांना अत्यावश्यक वस्तू संस्थेमध्येच उपलब्ध करून द्याव्यात
▪️ विद्यार्थी किंवा शिक्षण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेट करावे आणि त्यांच्या उपचारांची सोय संस्थेने करावी.
▪️ तसेच जर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर वर्ग घेणे बंद करावे , वसतिगृहातून बाहेर पडण्यास विद्यार्थ्यांना मनाई करणे, मेसमधून जेवण बाहेर देणे बंद करणे अशा उपाययोजना परिस्थितीच्या तीव्रतेप्रमाणे कराव्या असे आयोगाने स्पस्ट केले