वाशिम जिल्ह्यात कोरोना हरला तर जिल्ह्यावाशी कोरोना युद्ध जिंकले आज १५ कोरोना बाधित तर उपचार घेणारे फ़क्त १७४ रुग्ण

वाशिम जिल्ह्यात कोरोना हरला तर जिल्ह्यावाशी कोरोना युद्ध जिंकले आज १५ कोरोना बाधित तर उपचार घेणारे फ़क्त १७४ रुग्ण.


  कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि ६ नोव्हेम्बर २०


     जिल्ह्यातील एक्टिव रुग्नसंख्या पाहता जिल्हावाशी तसेच आरोग्य यंत्रणा,प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्ध जिंकले असून कोरोना हरला असल्याचे म्हणायला हरकत नाही 


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त शासकीय अहवालानुसार मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, गांधी चौक येथील १, शिरपूर येथील २, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील १, लोणी फाटा येथील १, हराळ येथील ४, बिबखेडा येथील २, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, कारंजा लाड शहरातील चावरे कॉलनी परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १९६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.


       कोरोना बाधितांची सद्यस्थिती


   एकूण पॉझिटिव्ह – ५७५४


   ऍक्टिव्ह – १७४


    डिस्चार्ज – ५४३६


      मृत्यू – १४३


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)