धरणे आंदोलनास पुंजानी यांची भेट

धरणे आंदोलनास पुंजानी यांची भेट


 कारंजा : प्रतिनिधी


      तालुक्यातील ग्राम पोहा येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी चंद्रकांत बळीराम अवताडे यांचा पोहा शिवनगर या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक लागून घडलेल्या अपघातात १६ आॅक्टोंबर रोजी सांयकाळी साडे ७ वाजता मृत्यू झाला होता या त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मृतकाच्या परिवाराची तक्रार कारंजा ग्रामीण पोलीसांनी दाखल करून घेण्यास नकार दिला सदर प्रकरणी फिर्याद दाखल करण्याकरीता त्यांच्या कुटुंबियांसमवेत १५ ते १६ जण कारंजा ग्रामीण पो स्टे मध्ये गेले असता त्यांच्याशी प्रभारी ठाणेदार निलेश शेंबाडे व ए एस आय परशराम राठोड यांनी दमदाटी करून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अशातच त्यांना रात्री साडे 3 वाजेपर्यंत बसवून ठेउुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली ग्रामीण पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात कारंजा तालुक्यातील पोहा परिसरातील नागरीकांनी एल्गार पुकारला असून ग्रामीण पो स्टे च्या प्रभारी ठाणेदाराच्या निलंबनासाठी कारंजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ६ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेकडो नागरीक सहभागी झाले होते.यावेळी धरणे आंदोलनात सहभागी मृतकाच्या परिवारातील सदस्य व पोहा येथील बहुसंख्य नागरिकांनी चंद्रकांत बळीराम अवताळे से नि पोलीस कर्मचारी यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रभारी निलेश शेम्बाडे व परशराम राठोड यांना निलंबित करण्याच्या मागणी साठी अवताडे परिवाराच्या वतीने कारंजा तहसील कार्यालयासमोर ६ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले यावेळी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले व संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी श्री राजुसेठ लाहोटी,सन्देश जिंतूरकर, अ एजाज,युनूस पहेलवान, जाकीर शेख,सै मुजाहिद, विठ्ठलराव लाड,हमीद शेख तथा कारंजा नप सदस्य,पदाधिकारी आदी उपस्थित होते