यंदा शाळांना दिवाळीच्या फ़क्त ५ दिवस सुटया जाहीर
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि ६
कोरोनामुळे राज्यातील सर्वच शाळा ह्या हाइटेक होऊन ऑनलाइन सुरु आहेत परिणामी ५ वी ते ९ पर्यत चे सर्व शिक्षण हे ऑन लाईन सुरु असून आता दिवाळी मुळे राज्यातील ऑनलाईन शाळांच्या सुट्या मध्ये शिक्षण विभागाने कपात केली आहे दर वेळेस १५ दिवस मिळणाऱ्या सुटया ह्या आता या वर्षी फ़क्त ५ दिवस भेटणार आहेत
राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर होणार अशी घोषणा काही दिवसापूर्वी - राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.
त्यानुसार या सुट्ट्या कशा पद्धतीने राहतील याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवस दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
तसे पाहले तर दरवर्षी दिवाळीची सुट्टी ही किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची राहते , मात्र यावर्षी सुट्यामध्ये कपात झाली आहे
दरम्यान या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापन बंद राहील, असे शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे